मूल बसस्थानकावर दोन पॉकेटमारांना केली अटक

39

दोन पॉकेटमारांना केली अटक
मूल : पैसे घेऊन परत येत असताना मूल बसस्थानकावर दोन पॉकेटमारांनी १८ हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. २४) मूल बसस्थानकावर घडली. यशवंत बाबूराव भरणे (रा. चामोर्शी) यांच्या फिर्यादीवरून शरद वाघोजी रुहारकर (४५, रा. वरोरा), ज्ञानेश्वर ऊर्फ नाना गुलाब मडावी (५३, रा. वरोरा) यांच्यावर मूल पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे. आरोपीवर मूल पोलिस ठाणे येथे कलम ३०३ (२), भारतीय न्याय संहिता
(बीएनएस) २०२३ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास मूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.