महारोगी सेवा समिती, वरोरा च्या सोमनाथ प्रकल्प येथील जेष्ठ कार्यकर्ते जयदेव करनकर यांचा वाघाच्या हल्यात म्रुत्यु।जयदेव आपल्या राहात्या घराच्या परिसरातील मागील बाजूस काम करीत असताना दि.८/६/२५ रोजी संध्याकाळी दाट झाडा झूडूपात दडलेला वाघाने हल्ला केल्याने निर्मल निकेतन वसाहती त राहणाऱ्या कुष्ठरोगी,अपंग,व्रूध्द रहिवाशांमधे भातीचे वातावरण झाले आहे यासाठी वनविभागाने सोमनाथ मधील वसाहती सभोवताली जाळी चे कुपंन घालून द्यावे अशी मागणी रहिवासी लोक करित आहेत.
आंबे तोडायला गेलेला परतलाच नाही करनेकर यांचा वाघाने घेतला बळी
मूल (चंद्रपूर) :सोमनाथ प्रकल्पातगेल्यादशकांपासूनवास्तव्यासचारअसलेले जयदेव पोतलू करनेकर(वय ६०, रा. विसोरा, ता. वडसा) यांचा रविवारी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस •आली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते सोमनाथ प्रकल्पात नेहमीप्रमाणे आंबे तोडण्यासाठी गेले होते. रविवारी दुपारी ३ वाजता जयदेव हे आंबे तोडण्यासाठी सोमनाथ प्रकल्पात गेले होते. यादरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले. घरच्या मंडळींनी जयदेव परत आले नसल्याची माहितीवनविभागाला दिली. वनविभागाने शोध घेतला. मात्र, उपयोग झाला नाही. सोमवारी सकाळी वाघाने जयदेवला ओढत वन विभाग कक्ष क्रमांक ७९२ येथे नेले होते.सोमवारी सकाळी ८:३० वाजता मूल वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहायक आर. सी. पेदापल्लीवार यांनी कर्मचाऱ्यांसह जंगलात शोध मोहीम राबविली असता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक ७९२ येथे जयदेव यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. रात्रभरात वाघाने मृतदेहाचा बराच भाग खाल्ल्याचे दिसून आले. जयदेव हे पत्नीसह सोमनाथ प्रकल्पात राहत होते. वनविभागाने मृताच्या नातेवाइकांना २० हजार रुपये सानुग्रह म्हणून मदत दिली आहे. वनविभागाने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.