पानठेला चालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण…

19

मूल :- तालुक्यातील जानाळा येथे पानठेल्यावर खर्रा घेण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या युवकांनी पानठेला चालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली व धारदार शस्त्राने गालावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता जानाळा येथे घडली. गुरुदास रामचंद्र पेंदोर (६०) असे गंभीर जखमी झालेल्या पानठेला चालकाचे नाव आहे तर मनीष प्रमोद चलाख (१८, रा. हळदी), वेदांत पुरुषोत्तम बुरांडे (१८, रा. वॉर्ड क्रमांक १७ मुल), आदर्श गोपालदास जांभुळकर (१९, रा. ताडाळा रोड वॉर्ड क्रमांक १७ मुल), अथर्व श्रावण कोपुलवार (१८, रा. वॉर्ड क्रमांक १७, ताडाळा रोड मूल) या आरोपींना अटक करण्यात आली आहे तर साहिल विनायक भुरसे (२१, रा. देवाडा खुर्द तालुका पोभुर्णा), कृष्णा योगेश व्यास(१८, रा. गुजरी चौक मूल, प्रेमसागर ) भास्कर कुंमरे (२५, रा. वॉर्ड क्रमांक १७ ताडाळा रोड मुल), मिथील डोमाजी गावतुरे (१९, रा. तेली मोहल्ला मूल) हे चार आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.गुरुदास पेंदोर यांचा मूल-चंद्रपूर मार्गावर जानाळा येथे पणाठेला आहे. रविवारी सायंकाळी मनीष प्रमोद चलाख, वेदांत पुरुषोत्तम बुरांडे व आदर्श गोपालदास जांभुळकर हे आरोपी पानठेल्यावर येऊन विनाकारण गुरुदास पेंदोर याला अश्लील भाषेत शिवीगाळकरत असताना फिर्यादीने शिवीगाळ करू नको, असे आरोपींना हटकले असता तू थोडा वेळ थांब तुला दाखवतोच म्हणून आपल्या मित्रांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून बोलावून फिर्यादीला खेचून बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. जखमीला चंद्रपूरला हलविण्यात आले.आरोपीविरुद्ध २०२३ २१६/२५ कलम ११८(१), १८९ (२), १९१
(२), १९१ (३), २९६,३५१(२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.