Home आपला जिल्हा Breaking News मुरमाडी येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान शिबिर

मुरमाडी येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान शिबिर

82

तहसील कार्यालय मूल आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांचे मार्फत ग्राम पंचायत मुरमाडी येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान /PM JANMAN योजने अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन दिनांक १७/०६/२०२५ रोजी करण्यात आले. या शिबिरात गट विकास अधिकारी मूल श्री. बी.एच. राठोड, नायब तहसीलदार मूल श्री प्रवीण चीडे, गृहपाल श्री. प्रशांत फरकाडे (आदिवासी मुलाचे शासकीय वसतिगृह मूल), डॉक्टर उराडे आरोग्य विभाग, रेवताताई मडावी सरपंच ग्रा. प. मुरमाडी, मंडळ अधिकारी श्री. संजय कानकाटे, ग्राम महसूल अधिकारी शंकर पिदूरकर, कु. गोपवार कृषी विभाग, ग्रामसेवक श्री धारणे , श्री मशाखेत्री सेतू केंद्र, पोलीस पाटील, JE पाणीपुरवठा, नरेगा APO, स्वच्छ भारत APO, विस्तार अधिकारी घरकुल विभाग व इतर अधिकारी व कर्मचारी या शिबिरात उपस्तिथ होते.

शिबिराच्या माध्यमातून शासकीय कार्यालयाच्या सेवा आपल्यापर्यंत पोहचल्या असून आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री बी एच राठोड गट विकास अधिकारी पं. स. मूल यांनी मुरमाडी येथील जनतेला केले. वैयक्तिक हक्कांची शंभर टक्के पूर्तता करण्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन नायब तहसीलदार श्री प्रवीण चीडे यांनी केले. गृहपाल प्रशांत फरकाडे यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत माहिती दिली. अश्विनी यंबरवर सिकलसेल विभाग उपजिल्हा रुग्णालय मूल यांनी ग्रामस्थांची सिकलसेल तपासणी केली असता त्यातील ०५ व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आले. पावन नागपुरे यांनी LFT, TFT KFT, बी.पी. इत्यादी तपासणी केल्या. सेतू केंद्रा मार्फत जातीचे दाखले, उत्पन्न दाखले काढण्यात आले. ग्रामसेवक श्री धारणे यांनी सूत्रसंचालन केले. शिबीर यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थांनी सहकार्य केले