मुल@ खरीप हंगाम २०२५ पूर्व तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण

30

कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मुल : खरीप हंगाम २०२५ पुर्व तालुका स्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषि अधिकारी, मुल च्या वतीने नुकतेच तहसिल कार्यालय, मुलचे सभागृहामध्ये करण्यात आले.
कार्यशाळेला अजय चरडे उपविभागीय
अधिकारी, मुल प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित
होते.

कार्यशाळेला गजानंद पवार उपविभागीय कृषि अधिकारी, चंद्रपूर व डॉ. स्नेहा वेलादी वरीष्ठ शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही हे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. सुनिल कारडवार तालुका कृषि अधिकारी, मुल यांनी प्रास्ताविकात पिकांचे लागवड खर्चात बचत करण्याकरीता करावयाच्या उपाययोजना व नियोजन बाबत मार्गदर्शन केले. तसेच गजानंद पवार उपविभागीय कृषि अधिकारी, चंद्रपूर यांनी कृषि विषयक तंत्रज्ञान व योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ.
स्नेहा वेलादी वरीष्ठ शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी कृषि यांत्रिकीकरण, भात पिक लागवड तसेच सुधारीत भात बियाणे व पुरक व्यवसाय बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. भुसारी पशुधन विकास अधिकारी यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली. सुधाकर खांडरे विस्तार अधिकारी कृषि पंचायत समिती मुल यांनी कृषि योजनांची माहिती दिली. एस. एम. कारडे कृषि पर्यवेक्षक यांनी नैसर्गिक शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा ची निर्मीती व वापराबाबत मार्गदर्शन केले. चट्टे कृषि सहाय्यक यांनी भात पिकावरील किड रोग नियंत्रण व भात पिकाचे अर्थकारण याबाबत मार्गदर्शन केले कृषि सहाय्यक के. जे. सातपुते व एस. डी. खिल्लारी यांनी बिजप्रक्रिया बाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन एस. ए. मंत्रीवार कृषि पर्यवेक्षक तर आभार प्रदर्शन टि.बी. उईके कृषि पर्यवेक्षक यांनी केले. (ता. प्र. )
शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
सदर प्रशिक्षणात शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती व लागवड संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला मुल तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी तसेच कृषि सखी, पशु सखी, मत्स्य सखी, शेतकरी उत्पादन कंपनीचे सभासद व सर्व कृषि सेवक, अधिकारी व कर्मचारी खरीप हंगाम २०२५ च्या प्रशिक्षणाकरीता उपस्थित होते.