प्रलंबित मागण्यांसाठी मूल कृषी सहायकांचे आंदोलन
कृषी सहायक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन कृषी सहायक संघटनेने सोमवार दि. ५ मे रोजी काळी फित लावून काम केले. काही दिवसांपूर्वीच प्रलंबित मागण्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आंदोलनाची पूर्तता न झाल्याने कृषी सहायकांनी आंदोलन केले. मूल
तालुक्यात १५ कृषीसहायक असून, सर्वचजण आंदोलनात सामील झाले
आहेत.
विभागीय चौकशी पूर्ण
होऊनही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही.
कृषी सहायक संवर्गाच्या आस्थापनाविषयी अडचणींची सोडवणूक करावी, अशी मागणी कृषी सहायकांची आहे टप्प्याटप्प्याने कृषी सहायकाने बेमुदत आंदोलन करणार आहेत याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर होणार असल्याचे चित्र आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांना निवेदन देताना कृषी सहायक संघटनेचे तालुका अध्यक्ष पदमाकर वाळके, सचिव रंगनाथ जाधव उपस्थित होते.