नगर परिषद मुल@वृक्षतोड प्रकरणी केला दंडाचा भरणा

65

वृक्षतोड प्रकरणी केला दंडाचा भरणा
नगर परिषद मुल क्षेत्रातील वार्ड क्रमांक 14 मधील बिएसएनल रोड ते आदिवासी होस्टेल रोड मार्गावरील एक कडूनिंबाचे झाड तोडत असल्याची तक्रार प्राप्त होताच त्वरित श्री संदीप दोडे मुख्याधिकारी नगर परिषद मुल यांनी दखल घेत मोका चौकशी व प्रत्यक्ष वृक्षतोड करताना साहित्यासह श्री. सागर वटटमवार यांचे सांगण्यावरून तोडत असल्याचे मजुरांकडून सिद्ध झाल्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल व दंड शुल्क रुपये 44,400/- भरणा करणे बाबत नोटीस देण्यात आली त्यानुसार त्यांनी दिनांक 07/05/2025 रोजी दंड शुल्क भरणा केलेला आहे.
तरी मुल नगर वासियांना सूचित करण्यात येते कि, नागरीकरण व औद्योगिककरण यांच्या वाढत्या गतीमुळे राज्याच्या नागरी क्षेत्रात झाडांची मोठ्या प्रमाणावर बेछुट वृक्षतोड करण्यात येत आहे. झाडे तोडण्याचे नियमन करून राज्याच्या नागरी क्षेत्रातील झाडांचे जतन करण्यासाठी अधिक चांगली तरतूद करण्याकरिता आणि त्या क्षेत्रात समुचित प्रमाणात नवीन झाडे जतन व संगोपन करणे आवश्यक आहे.
वृक्षतोड होवू नये याकरिता नगर परिषदेमार्फत वेळोवेळी जाहीर सूचना व प्रसार मध्यमाद्वारे जनजागृती करून सुद्धा नागरिक वृक्षतोड करीत आहे. तरी महाराष्ट्र [ नागरी क्षेत्र ] झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 मधील कलम 21[1] तरतुदींचे उल्लंघन करून जी व्यक्ती कोणतेही झाड तोडील किवा कोणतेही झाड तोडण्यास कारणीभूत होईल त्या व्यक्तीवर अधिनियमानुसार झाडाचे वयानुसार, त्यांचे संगोपन व संवर्धन खर्च रक्कम 50,000/- रुपये पर्यंत दंड व एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. याकरिता नागरिकांनी वृक्षतोड करू नये जास्त प्रमाणात झाडे लावून त्याचे संगोपन करून पर्यावरणला सहकार्य करावे असे आवाहन श्री संदीप दोडे मुख्याधिकारी नगर परिषद मुल यांनी केले आहे-