नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) आपली CGL (Combined Graduate Level) भरती २०२५ साठीची अधिसूचना अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध केली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ९ जून २०२५ रोजी सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ जुलै २०२५ असून, तो रात्री ११:०० वाजेपर्यंत स्वीकारला जाईल. शुल्क भरण्याची अंतिम मुदत ५ जुलै २०२५ आहे. अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास, ती ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत करता येईल.
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये गट ‘ब’ (Group B) आणि गट ‘क’ (Group C) संवर्गात अनेक पदे भरण्यात येणार आहेत. गट ‘ब’ संवर्गामध्ये, सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer), आयकर निरीक्षक (Income Tax Inspector), केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क निरीक्षक (Central Excise and Customs Inspector), अंमलबजावणी अधिकारी (Enforcement Officer) आणि उपनिरीक्षक (Sub-Inspector) (CBI व NIA) यांसारख्या पदांचा समावेश आहे.त्याचबरोबर, गट ‘क’ संवर्गात लेखापाल/ऑडिटर (Accountant/Auditor) (CAG व CGDA अंतर्गत), पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंट (Postal/Sorting Assistant) (डाक विभागात), कर सहाय्यक (Tax Assistant) (CBDT व CBIC अंतर्गत) आणि वरिष्ठ सचिवालय सहाय्यक (Senior Secretariat Assistant) (केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये) या पदांचा समावेश आहे.सहायक विभाग अधिकारी, निरीक्षक (कर), उपनिरीक्षक (CBI/NIA) या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक ₹44,900 ते ₹1,42,400 पर्यंत वेतन दिले जाईल. कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक आणि उपनिरीक्षक या पदांसाठी मासिक ₹35,400 ते ₹1,12,400 पर्यंत वेतन दिले जाईल.
जाहिरात क्र.: HQ-C11018/1/2025-C-1 | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Total: 14582 जागा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025 | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
पदाचे नाव & तपशील:
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शैक्षणिक पात्रता:
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
महत्त्वाच्या तारखा:
|
त्याचप्रमाणे, लेखापाल, ऑडिटर आणि कनिष्ठ लेखापाल या पदांवर नियुक्त उमेदवारांना मासिक ₹29,200 ते ₹92,300 पर्यंत वेतन मिळेल. आणि पोस्टल असिस्टंट, कर सहाय्यक आणि वरिष्ठ सचिवालय सहाय्यक या पदांसाठी मासिक ₹25,500 ते ₹81,100 पर्यंत वेतन दिले जाईल.
सर्वसाधारण पदांसाठी, उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर (JSO) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १२ वी मध्ये गणित विषयात किमान ६०% गुण असणे बंधनकारक आहे, किंवा त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात सांख्यिकी हा विषय असणे आवश्यक आहे.