सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रम !

25

मूल/तालुका प्रतिनिधी  शैक्षणिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असलेल्या सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे महाराष्ट्र दिनानिमित्य संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकिलीचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळा सल्लागार समितीचे सल्लागार प्रा. महेश पानसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप, संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक कडुकर,शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार, सदस्य माजी सैनिक मारोती कोकाटे, गीताचार्य गणेश मांडवकर, सुखदेव चौथाले, डेव्हिड खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुवर्णा पिपरे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष मडावी, माजी नगराध्यक्ष उषा शेंडे, माजी सभापती लीना बद्देलवार, सुनिल गायघने, हुसेन जराते, माया कोहपरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी शाळेतील वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाची माहिती देत पुढील शैक्षणिक वर्षात शाळेत विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षण देण्याचा व त्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी शाळा प्रयत्नरत राहणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. प्रा. महेश पानसे यांनी मार्गदर्शनात शाळा विविध उपक्रमात अग्रेसर असल्याने दिवसदिवस शाळेची प्रगती होत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत असल्याचे दिसुन येत आहे. ही आनंदाची बातमी असल्याचे सांगत सर्व शिक्षकांनी आपली शाळा म्हणुन काम केल्यास नक्कीच बदल घडुन येईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवर तर उपस्थितांचे आभार पदवीधर शिक्षक राजू गेडाम यांनी मानले.