Home आपला जिल्हा Breaking News मूल येथे श्री अष्टविनायक मंदिरात श्री गणेश प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

मूल येथे श्री अष्टविनायक मंदिरात श्री गणेश प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

123

मूल : वार्ड क्रमांक 14 व 15 परिसरात, बालविकास शाळेजवळ श्री अष्टविनायक मंदिर संस्थानतर्फे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दिनांक 25 मार्च 2026 रोजी, बुधवारच्या रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत भजन व कीर्तनाच्या माध्यमातून जागरण करण्यात आले. या भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला.

त्यानंतर दिनांक 26 मार्च 2026 रोजी, गुरुवारी सकाळी 9 ते 11.30 वाजेदरम्यान संपूर्ण प्रभागात भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला व भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

यानंतर सकाळी 11.30 वाजता अभिषेक विधी पार पडला. दुपारी 12.30 वाजता पंडित नितीन तिवारी (कन्यका माता परमेश्वरी मंदिराचे पुजारी) यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी होम-हवन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाभोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने मूल शहरातील नागरिकांनी घेतला.

अगदी छोट्या जागेतही सुंदर, आकर्षक आणि मनमोहक मंदिर उभारता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री अष्टविनायक मंदिर संस्थान, मूल येथील हे श्री गणेश मंदिर होय.