Home आपला जिल्हा Breaking News दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास मूल पोलिसांकडून बेड्या..

दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास मूल पोलिसांकडून बेड्या..

215

मूलः शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये झालेली घरफोडी आणि दुचाकी चोरीची घटना मूल पोलिसांनी बुधवारी दि. १३ अवघ्या ८ तासांत उघडकीस आणली आहे. याप्रकरणी अनिकेत सचिन मंडल (२२, रा. चंद्रपूर) याला अटक करण्यात आली. चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. शिक्षक भोपसिंग पवार हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील साहित्य आणि दुचाकीची चावी चोरून अंगणातील दुचाकी लंपास केली होती. ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.