मूल तालुका महसूल विभागाने मूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन उपविभागीय कार्यालय मूल येथील हॉल मध्ये केले होते. शिबिरात 90 नागरिकांना सेवा आणि विविध दाखले वितरित करण्यात आले.
नागरिकांना एकाच ठिकाणी दाखले आणि तत्सम सरकारी सेवा मिळावी यादृष्टीने हे शिबिर घेण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी तसेच प्रलंबित कामे करून नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा देणे या उद्देशाने महाराजस्व समाधान शिबिर राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी शुभारंभ प्रसंगी केले, तर हे अभियान नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असून, त्याचा लाभ नागरिक घेत असल्याचे समाधान
या वेळी तहसीलदार चिडे , नायब तहसीलदार पंडीले,मुलच्या नगराध्यक्षा सौ.एकता प्रशांत समर्थ तसेच मुख्याधिकारी, नगरसेवक समर्थ ,विविध विभागातील अधिकारी,तसेच कर्मचारी वृंद व कृषि अधिकारी,भूमि अभिलेख अधिकारी,आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांना विविध दाखले, जमिनीचे ७/१२ व ८ अ वाटप करण्यात आले. तसेच ७/१२ अद्यावत करणे, घरकुल पट्टे वाटप, ई-मोजणी, पाणंद रस्ते, अभिलेख दुरुस्ती, अकृषिक मार्गदर्शन, पी.एम. किसान योजना, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन, सामाजिक योजनांचा लाभ, लोकसेवा हक्क अंतर्गत तत्काळ सेवा व आरोग्य तपासणी अशा विविध सेवा एक दिवस सेवा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या.








