Home आपला जिल्हा Breaking News उद्या मूल येथे महसूल चे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

उद्या मूल येथे महसूल चे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

13

नागरिकांना मिळणार विविध योजनांचा लाभ
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मूल तहसील कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना महसूल सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे.

तहसील कार्यालय मूल येथे 08 मे २०२६ रोजी सकाळी 10 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे. अभियानांतर्गत मूल तालुक्यातील मूल महसूल मंडळ नागरिकांसाठी विविध महसूल सेवा व तक्रार निवारणाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये एक खिडकी योजना (विविध नमुने ७/१२ आणि ८ अ), मालमत्ता कर नोंदणी निपटारा, अभिलेख दुरुस्ती, विविध दाखले वाटप तसेच अकृषक अभिमूल्य भरणा अशा सेवा दिल्या जाणार आहेत. याशिवाय, या अभियानात नागरिकांना महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित कामांसाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार चिडे यांनी केले आहे.

शिबिरात मिळणाऱ्या सेवा:
✅ 7/12 मधील चुका दुरुस्ती
✅ प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली
✅ उत्पन्न दाखला
✅ अधिवास (Domicile) दाखला
✅ जातीचा दाखला
✅ महसूल विषयक मार्गदर्शन

या शिबीरामध्ये खालीलप्रमाणे महसूल विभाग व इतर शासकीय विभागांच्या सेवांचा लाभ दिला जाणार आहे
१.प्रलंबित फेरफार निकाली काढणे
२. जिवंत ७/१२ मोहीम
२. ⁠शालेय दाखले वाटप
३. ⁠विशेष अर्थसहाय योजना लाभ
४. ⁠पी एम किसान योजना
५. ⁠अग्रिस्टॅक योजना
६. ⁠७/१२ अद्ययावतीकरण
७. ⁠नवीन अकृषक धोरण माहिती देणे
८. ⁠भोगवटा २ जमिनी नियमानुसार वर्ग १ बाबत कार्यवाही
९. ⁠तुकडेबंदी धोरण बाबत कार्यवाही करणे

आदी कामे केली जाणार आहेत
तरी याचा सर्व नागरिक, शेतकरी , विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल चे तहसीलदार चिडे यांच्याकडून करण्यात आले आहे.

💡 विशेष: नागरिकांना एकाच दिवशी सेवा देण्यासाठी Single Day Service सुविधा उपलब्ध असेल.
👉 सर्व नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.