पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यभरात घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ २१ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवार, २७ मार्च १६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी टीईटी घेतली जाते. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर १ व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर २ या स्वरूपात टीईटी आयोजित केली जाते. शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी
उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे २१ जून रोजी होणाऱ्या टीईटीसाठ परीक्षा परिषदेने वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये उमेदवारांना २७ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरता येईल. ९ जून ते २१ जून य कालावधीत ऑनलाइन प्रवेशपत्र घेण्याची सुविधा दिली आहे. पेप १ ची परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. तर पेपर २ ची परीक्षा दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील काही प्रशासकीय अडचणीमुळे वेळापत्रकात बदल होण्याच शक्यता नाकारता येत नाही याबाबत उमेदवारांना परीक्ष परिषदेच्या संकेतस्थळावरून अधिकृत माहिती देण्यात येईल, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळवले आहे.








