TAIT 2025 Exam @शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या वेळापत्रकात बदल

17

Pune : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या वेळापत्रकात बदल
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, जी परीक्षा दि. 24 मे ते 5 जून या कालावधीत होणार होती, आता ती 27 ते 30 मे आणि 2 जून ते 5 जून यादरम्यान होणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे 2 लाख 36 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षा केव्हा होणार, याबद्दलची माहिती परीक्षा परिषदेने पूर्वीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केली होती. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधा विचारात घेऊन 24 मे ते 5 जून या कालावधीत उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या.
मात्र, परीक्षा परिषदेने परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे, तसेच परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
उमेदवारांनी परिषदेने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेतील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.