शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषि केंद्रातूनच, खत, बियाणे खरेदी करावे-कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

23

मूल : चालू वर्षातील २०२५- २६ खरीप पिकांसाठी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी खात, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी कारवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
बोगस व बेकायदेशीर बियाणे म्हणजे काय ज्या बियाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची
परवानगी नसते, विद्याण्याच्या उत्पन्नासंबंधी मनघडण व खोटे दावे करून आमीष दाखविण्यात येते, बियाण्याच्या व्यवहारांमध्ये शासनमान्य गराचे अधिकृत बिल शेतकन्यास दिले जात नाही, बियाण्याच्या पाकिटावर वियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो, अनाधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाई चे हमी शासन व ग्राहक मंच सुद्धा पेऊ शकत नाही असे चियाणे बोगस व कायदेशीर असते. शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. यासाठी पक्क्या विलाचाच आग्रह धरावा. विक्रेता पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारीयांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी. बिलावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवतेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे क्रिया नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे पॉकीट सीलचंद, मोहरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी. बियाण्याच्या उगवणक्षमतेचा अंतिम मुदतीचा दिनांक पाहूनच पॉफीट किया बैंक खरेदी करावी. एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. रासायनिक खत खरेदी करताना बॅग वरील एमआरपी किमत
बघूनच खरेदी करावी. जर कोणताही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाण्याची, खताची विक्री
करतानाआढळल्यासत्याच्याविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश १९८३ रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल. अशी बोगस बियाणे व खते विक्रीचा बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकरी बंधुना कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन गैरप्रकार आढळल्यास त्वरित तक्रार कराआवाहन केले आहे. (ता. प्र. )