महाडीबीटी पोर्टल: शेतकरी लाभापासून राहणार वंचित

30

MahaDBT Portal राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत गळीतधान्य योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टके अनुदानवर मोफत प्रमाणित सोयाबीन, तूर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना गुरुवार २९ पर्यंत महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचे होते.
मात्र, गत काही दिवसांपासून पोर्टलचे सर्व्हर ठप्प पडल्याने अनेक शेतकऱ्यांची
नोंदणी झालीच नाही. परिणामी, शेतकरी अनुदान बियाण्यांपासून वंचित राहण्याची शयता आहे.
शेतकऱ्यांना गळीतधान्य योजनेंतर्गत १०० टके अनुदानावर मोफत सोयाबीन, तूर बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर गुरुवारपर्यंत अर्ज सादर करायचे होत. योजनेचा लाभ घेताना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक होते. अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ५ वर्षाच्या आतील बियाणे तालुकास्तरावरील वितरकाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. MahaDBT Portal यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त करून घेता येणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पोर्टलचे सर्व्हर डाउन दाखविण्यात येत असल्याने नोंदणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. योजनेचा लाभ किमान २० आर. ते कमाल एक हेटर क्षेत्रासाठी घेता येणार आहे. बीबीएफ, रूंद वरंबा सरी, टोकण पद्धतीने लागवडीकरिता एकरी २२ किलो याप्रमाणे एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त दोन लाभ दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी मोफत बियाणे
शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांची २४ मार्च २०२४ पूर्वी आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड आदी संस्थेकडे नोंदणी आहे MahaDBT Portal अशा शेतकरी गटांना तूर व सोयाबीन पिकांचे प्रात्यक्षिकसाठी १०० टके अनुदानवर मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात
येणार आहे. मात्र, या अभियानापुढे पोर्टलच्या सर्व्हरचा खोडा निर्माण झाला आहे.