अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ५ जूनपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ

33

ऑनलाइन प्रवेशाला५ जूनपर्यंत मुदतवाढ
 इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ५ जूनपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्याबाबत शासनाने आदेशित केले.
२६ मेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू झाली होती. त्याची अंतिम तारीख ३ जूनपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. इन हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के जागा आरक्षित राहणार आहेत.
पसंतीक्रम ठरवणार
या बदलाच्या अनुषंगाने वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांच्या
१ शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनामहाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ५ जून रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Deadline has been extended up to 5th June 2025, 2:00 PM for student registration and preference form.