अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडण्याची संधी, ही 6 कागदपत्र ठेवा तयार

59

11th Admission Process : अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडण्याची संधी, ही 6 कागदपत्र ठेवा तयार

Notice for Parents and Students: The registration process for students interested in taking admission for Class XI for the academic year 2025 – 26 will begin from Monday, 19.05.2025. पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. १९.०५.२०२५ पासून सुरू होईल.


FYJC College Selection, 11th Admission इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी 13 मे 2025 रोजी जाहीर झाला. आता विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यंदा आकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेता येणार आहेत.
परंतु या प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणते कॉलेज निवडता येतील आणि किती कॉलेज निवडण्याची मुभा अशी अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. या
विद्यार्थ्यांना 10 कॉलेज निवडता येणार
अकरावीच्या (FYJC) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यानुसार 10 कॉलेज निवडण्याची संधी मिळणार आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म लवकरच उपलब्ध होईल. त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कॉलेजची नावे नोंदवावी लागतील. यानंतर मेरिट लिस्ट जाहीर होईल. यात कॉलेजच्या कट-ऑफनुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड होईल.
अकरावी प्रवेशासाठी ही 6 कागदपत्रे अनिवार्य
दहावीची गुणपत्रिका
शाळा सोडल्याचा दाखला
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
दुर्बल घटकातून अर्ज करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला
प्रवेशासाठी दोन फॉर्म भरावे लागणार
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना दोन फॉर्म भरावे लागतील. पहिल्या
फॉर्ममध्ये मूलभूत माहिती भरावी लागेल, तर दुसऱ्या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या
पसंतीच्या 10 कॉलेजांची नावे नोंदवावी लागतील.
प्रवेशाचे निकष आणि मेरिट लिस्ट
अकरावी प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून 55 टक्के, तर आरक्षित प्रवर्गातून 45 टक्के जागा भरल्या जातील. प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण तीन मेरिट लिस्ट जाहीर केल्या जातील. गरजेनुसार त्यानंतर एक विशेष मेरिट लिस्टही जारी केली जाईल.

Publish on : 09/05/2025
Instructions for Schools / Higher Secondary Schools: The registration process for schools / higher secondary schools for the academic year 2025 -26 for class XI is underway and will be completed by 15th May 2025.
शाळा / उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या साठी सूचना : शैक्षणिक वर्ष 2025 -26 इयत्ता अकरावी साठी शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू असून दि. १५ मे २०२५ पर्यंत करता येईल.

Publish on : 09/05/2025
Notice for Parents and Students : The registration process for students interested in taking admission for Class XI for the academic year 2025-26 will begin from Monday, 19.05.2025.
पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. १९.०५ .२०२५ पासून सुरू होईल.