हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक ‘
या अभियान अंतर्गत मुल्यांकनावर गुणवत्ता चाचणीसाठी आज शुक्रवारी 16/05/2025 ला MUL आगारात राज्य परिवहन महामंडळाच्या चमुने भेट देत पाहणी केली. यावेळी बसस्थानक परिसरात संपूर्ण असलेल्या स्वच्छता व विविध उपक्रमांचे मुल्यांकन केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात आज १६ मे रोजी ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे सर्वेक्षण करून पहिले मूल्यांकन करण्यात आले. प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील पुणे प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, पुणेचे प्रादेशिक अभियंता कार्तिक सहारे, जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष व प्रवासी संघाचे अध्यक्ष,दीपक देशपांडे, तसेच दै. लोकमत समाचार चे मूलचे पत्रकार चंद्रकांत मनियार यांच्या चार सदस्यीय समितीने मूलच्या बसस्थानकाची पाहणी केली.
या अभियानात ‘अ’ वर्गातील बसस्थानकाचे चार वेळा मूल्यांकन होणार आहे.
आज या प्रादेशिक समितीतर्फे मूल बसस्थानकाचे प्रथम मूल्यांकन करण्यात आले. यानंतर तीन वेळा मूल्यांकन होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला एक करोड रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे ,तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत दिवसेंदिवस अधिकाधिक चुरस निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
मूल बसस्थानकाचे मूल्यांकन करताना समितीतर्फे बसस्थानक, परिसरासह पुरुष व महिलांच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, दिशादर्शक सुचनाफलक , बसस्थानकाची रंगरंगोटी, बसस्थानकाचे नाव व फलाटावरील फेरीनिहाय गावाचे फलकांचे निरीक्षण केले. बसस्थानकावरील चौकशी खिडकीच्या बाजूला वेळापत्रक, उद्घोषणा यंत्रणा, प्रवाशांच्या तक्रारी, सूचना संबंधित बसस्थानकासह आगार व आगार व्यवस्थापकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, चालक व वाहकांचे विश्रांतीगृह, बसस्थानकावरील चौकशी, आरक्षण सोयीसुविधा, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी मासिक पास खिडकीची सुविधा, रेलिंग, वाणिज्य आस्थापना आणि पार्किंग व्यवस्थेबद्दल सर्वेक्षण करण्यात आले.
यानंतरही तीनदा हे मुल्यांकन होऊन नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
आजच्या काही उणीवा भरुन काढता आपले बसस्थानक अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असावे यासाठी स्थानिक पातळीवर महामंडळाचे कर्मचारी,व जनता कितपत सहकार्य करतात यावर या स्पर्धेत मूलचे बसस्थानक टिकेल की नाही हे ठरणार आहे , त्यामुळे प्रत्येकाने आपला सहभाग दर्शविणे आवश्यक आहे ,व आपले बसस्थानक स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Post Views: 35