मूल पोलिस स्टेशन कार्यालय बाजार चौक न.प. महाराष्ट्र बँक बाजार चौक येथे ब्रिटिश कालीन इमारतीमध्ये कित्येक वर्षांपासून कार्यरत होते. परंतु जुन्या इमारतीचे रूपांतर नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये व्हावे या हेतूने जुन्या ब्रिटिश कालीन इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकाम सुरु करायचे असल्याने सद्यस्थितीत मुल पोलिस स्टेशन स्थलांतरण न्यायालयाच्या इमारतीच्या मागे, जुन्या सिंचाई विभागाच्या इमारतीमध्ये करण्यात आले आहे. पोलिस स्टेशनकडे जाण्याचा रस्ता उपविभागीय पोलिस अधिकारी मुल कार्यालयाच्या बाजूने, जुन्या पटवारी कार्यालयासमोरील रस्त्यावरून जाता येईल. तरी मुल शहरातील नागरिकांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्यांना कोणाला कार्यालयाचा पत्ता समजला नाही त्यांनी 07174 220227 या फोन नंबरवर संपर्क साधावा अशी विनंती पोलिस प्रशासनाने जनतेला केली आहे.
Post Views: 64