देहगांव येथील महिला सर्पदंशाने मृत्यू

76

मूल,
तालुक्यातील देहगांव येथील महिला सर्पदंशाने मृत्यू
स्व.सौ. निर्मला नानाजी वेलके वय ५५ वर्षे आपल्या पतीसोबत स्वतःचे शेतावर काम करण्याकरिता गेली होती. पती नानाजी शेताची पाहणी करीत असताना पत्नी निर्मला हिला त्याने सांगितले बैलांसाठी गवत काप, शेताच्या पाल्यावर असलेला गवत कापताना गुळघ्याच्या खाली गवतात असलेल्या विषारी सापणे तिला चावा घेतला ती बसून गवत कापत असल्याने तिच्या लक्षात आले नाही, दुपारी घरी आल्यानंतर तिची अचानक प्रकृत्ती बिघडल्याने औषधोपचार करण्याकरिता मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. आठवड्यातील सर्पदंशाने मृत्यू ची ही दुसरी घटना आहे.