मूल बस स्थानक@सोन्याचे दागीने चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड करण्यात पोलीसांना यश

42

सोन्याचे दागीने चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड
चंद्रपूर : सोन्याचे दागीने चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड करण्यात पोलीसांना यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. आरोपींकडून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने २ लाख ५० हजार रुपयाचे जप्त करण्यात आले आहे.
मूल बस स्थानक येथे येथुन प्रवाश्यांचे गर्दीत बस मध्ये चढुन बसच्या आत गेली असता तिचे गळयातील असलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याची गोप कोणीतरी अज्ञात चोरटयांनी
गर्दीचा फायदा घेवुन गळयातुन काढुन चोरी केल्याचे तक्रारीवरुन पोस्टे मुल येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. यावरुन मूल पोलीसांनी बस स्थानक परिसरात सतत लक्ष ठेवुन सोन्याचे दागीने चोरी
करणाऱ्या टोळीच्या मागावर असतांना दि. ३०/५/२०२५ रोजी पेट्रोलींग दरम्यान सदर टोळीच्या महिला जमुना हितेश उर्फ संदिप नाडे उर्फ वाघमारे (३५), लक्ष्मी जगनु मानकर (४०) दोन्ही रा. रामेश्वरी टोली, ता. नागपुर यांना ताब्यात घेवुन त्याचे कडे कौशल्यपूर्ण व तांत्रीक पध्दतीने तपास केला असता सदर महिला यांचे विरुध्द नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती तसेच हैदराबाद येथील विविध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातंर्गत बस स्थानक परिसरात प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर महिलांकडे बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी दि. ६/५/२०२५ रोजी आणि २० / ५ / २०२५ रोजी
मुल बस स्थानकावरुन प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी केल्याची कबुली दिल्याने
त्यांच्याकडुन २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने किंमत २,५०, ००० रुपयाचे जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात भाऊराव बोरकर, भोजराज मुडरे, जमीरखान पठाण, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, सिमा निषाद यांनी केली आहे.