शेतकरी पीकविम्यात आता तांत्रिक अडचणीचा खोडा !
दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन : विमा काढण्यासाठी उरले चार दिवस
नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकरी पीकविमा काढत आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने पीकविम्याची नोंदणी रखडल्यामुळे शेतकऱ्यांसह आपले सरकार केंद्रचालक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नैसर्गिक आपत्ती जसे की, अतिरिक्त पाऊस, पूरस्थिती यांसारख्या नैसर्गिक संकटापासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून पीकविमा काढण्यासाठी सरकारने यावर्षीपासून एका गटाला व एका पिकासाठी एक रुपया असा शेतकरी हप्ता ठरवलाय तसेच शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी महसूल विभागाने आवाहन केले.
मात्र, पीकविमा अर्ज सादर करण्यासाठी पोर्टलमुळे सुरुवातीचे काही दिवस अर्ज सादर केले जात नव्हते. मध्यंतरी पोर्टल व्यवस्थित सुरू होते; मात्र पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून पोर्टलला घरघर लागल्याचे चित्र दिसत आहे. परत नोंदणी होत नसल्याची बोंब आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्याने उशिरा अर्ज सादर केले, त्यांचे अर्ज सादर होत नसल्याने शेतकरी व आपले सरकार सेवा केंद्रचालक यांच्यामध्ये विनाकारण वाद होत आहे. विमा नोंदणीसाठी आता केवळ काहीच दिवस अवधी असल्याने शेतकऱ्यांची सेवा केंद्रात गर्दी होत आहे. डिजिटल सातबाराची साइट संथगतीने सरुकाही शेतकरीवर्गाकडे चालू वर्षातील सातबारा नसल्याने डिजिटल सातबारा काढून पीकविमा
काढला जात होता; मात्र सातबाराचीसाइटसुद्धा संथगतीने चालत असल्याने पीकविमा भरण्यात अडचण येत आहे.
दुरुस्तीविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
ज्या शेतकऱ्यांमध्ये अर्ज सादर करताना पोर्टलवर बँक तपशील चुकला असेल किंवा पीक चुकीचे टाकले गेले असेल, असे फार्म दुरुस्तीसाठी जिल्हा व्यवस्थापनाने जी लिंक दिली होती, त्यावर अनेकांनी अर्ज सादर केले. मात्र अद्याप अर्ज आपले सरकार सेवा केंद्र संचालकाकडे परत न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. केंद्रावर शेतकरी येत असल्याने त्यांच्याकडून फक्त अर्ज भरुन घेणे सातबारा, आधार कार्ड ,स्वयंघोषणापत्र,पासबुक हे भरून घेण्यातच वेळ जात आहे. केंद्र संचालक त्यांना रात्रभर जागून सदर अर्ज भरावे लागत आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पोर्टल बंद असल्यामुळे केंद्रचालक व शेतकरी त्रस्त झाले आहेत.
Home आपला जिल्हा Breaking News विमा काढण्यासाठी उरले चार दिवस@सर्व्हर डाऊन ! सातबाराची साइटसुद्धा संथगतीने