Home आपला जिल्हा Breaking News सेतू केंद्राचे सर्व्हर तांत्रिक अडचणीमुळे ठप्प

सेतू केंद्राचे सर्व्हर तांत्रिक अडचणीमुळे ठप्प

51

विविध शासकीय योजनांसाठी वापरले जाणारे सीएसएसी संकेतस्थळ सध्या बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर या संकेतस्थळाचा वापर करतात; मात्र संकेतस्थळ बंद असल्यामुळे कामे रखडली असून नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. काहींना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दोन दिवसांपासून सेतू सुविधा केंद्र बंद गेल्या दोन दिवसांपासून  सेतू सुविधा केंद्र आणि सीएससी सेंटर बंद पडले आहेत. या ठिकाणावरून कुठलेही प्रमाणपत्र निघत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. भर उन्हात विद्यार्थ्यांसह पालकांना येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. ऑनलाईन प्रणालीच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या दुरुस्तीमुळे मार्चअखेरीस सीएससी सेंटर आणि भूमी अभिलेख विभागाची साईट आठ दिवस बंद होती. – याचा फटका  शेतकऱ्यांना सहन करावा लागला. ही सेवा सुरळीत होत नाही तर पुन्हा संपूर्ण सर्व्हरच बंद पडला आहे. या सेंटरवरून कुठलेही कागदपत्रं निघत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.
संपूर्ण राज्यभरात सेतू केंद्राचे सर्व्हर तांत्रिक अडचणीमुळे ठप्प पडले होते. परिणामी, दर दिवसाला या ठिकाणावरून होणारी विविध कागदपत्रांची प्रक्रिया खोळंबली होती. याचा फटका शेतकरी, विद्यार्थी आणि लाडक्या बहिणींना बसला.
प्रतिज्ञापत्राच्या अडचणी
महाविद्यालयीन प्रवेशापूर्वी विविध कागदपत्रं काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सेतू केंद्र आणि सीएससी केंद्रांवर गर्दी केली आहे. याचवेळी हे केंद्र बंद पडल्याने उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्व, प्रतिज्ञापत्र, शेताचा सातबारा, मिळकत पत्रिका या दस्ताऐवजांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

तांत्रिक अडचणीमुळे सर्व्हर ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. सायंकाळपर्यंत सर्व्हर सुरळीत होईल, असा मेसेज आहे. मात्र, अद्याप दुरुस्ती झालेली नाही. सिध्देश पूठावार सेंतू केन्द्र चालक मारोडा