मूल तहसील कार्यालयामध्ये आज आपले सरकार सेवा केंद्र चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसिलदार मोरे यांनी विविध सूचना देऊन मार्गदर्शन केले आहे.तसेच बैठीला नायब तहसीलदार पवार,पंडीले,पुरवठा निरीक्षक शीरभाते,तसेच महसूल कर्मचारी तेलंग ,तसचे कस्तुरे कर्मचारी व मूल तालुक्यातील मूल शहरातील आपले सरकार सेवा केंन्द्र संचालक उपस्थित आज दिनांक 5 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता बैठक संपन्न झाली.

ऑनलाइन प्रमाणपत्रांच्या कामकाजाबाबत आयोजित केलेल्या बैठकीचा उद्देश प्रलंबित अर्जांचा निपटारा, प्रणालीतील त्रुटी सोडवणे आणि महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा RTPS पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक वेगवान करणे ,प्रलंबित अर्जांचा आढावा (Pending Applications)उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अधिवास (Domicile) प्रमाणपत्र, आणि नॉन-क्रिमीलेअर दाखले, नागरिकांसाठी सुलभतानागरिकांना विहित मुदतीत प्रमाणपत्रे मिळतील .

सेतू सुविधा केंद्रावर जास्तीची रक्कम देऊ नका तहसील कार्यालयाकडून निर्गमित केले जाणाऱ्या दाखल्यांचा कालावधी वय,अधिवास 15 दिवस,जाताीचे प्रमाणपत्र 21 दिवस उत्पन्न प्रमाणपत्र 15 दिवस नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 21 दिवसांचा असून सदर दाखले मुदतीच्या आत मिळण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर जास्तीची रक्कम देऊ नये असे मूल येथील तहसीलदार मृदुला मोरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे
सेतू सुविधा केंद्र चालकाकडून रीतसर पावती घेऊन शासनाच्या फी व्यतिरिक्त जास्तीचे पैसे नागरिकांनी सेतू सुविधा केंद्रावर देऊ नये.” नागरिकांना आवाहन केले आहे.








