राज्याचे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान होण्याच्या उदेशाने जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मृदुला मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल तालुक्यातील बेंबाळ येथे आज 7 मार्च सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र 1 राबविण्यात येत आहे. महसूल अभियानाचा लाभ घ्यावा : मृदूला मोरे
मूल : महसूल विभागातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत तालुक्यात विविध मंडळांमध्ये समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मृदूला मोरे यांनी दिली आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले जात आहे. या शिबिरांमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या शिबिराअंतर्गत तालुक्यातील विविध गावात महसूल प्रशासन पोहोचणार असून ७/१२ उतारा दुरुस्ती व डिजिटल ७/१२ वितरण, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, जात, उत्पन्न, रहिवासी आदी दाखल्यांचे वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनांची माहिती, मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना, शासन जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण व पट्टे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दाखले वितरण, हेल्पडेस्कद्वारे अभिलेख दुरुस्ती मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे ५ मार्चपर्यंत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करावीत, असे आवाहन तहसीलदार मृदूला मोरे यांनी केले आहे.






