Home आपला जिल्हा Breaking News मुल पोलिसांची कारवाई@ लोहा व सिमेंट चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

मुल पोलिसांची कारवाई@ लोहा व सिमेंट चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

79

मुल पोलिसांची कारवाई, २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त
मुलः तालुक्यातील नांदगाव येथे आरोपीने कोणतीही माहिती न देता आयएचपी गोडाऊन मध्ये ठेवेले साहित्य चोरी केले असून या संबधात फिर्यादीने तक्रार करताच मुल पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपीला २ लाख ८२ हजार ८५३ रूपयांचा मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी श्रीकांत कामीडवार याने आय एस पी कंपणी गोडाउन मौजानांदगाव येथेखतःचे ट्रक्टर ट्रालीने जावुन कंपनीच्या मालक व फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता आय एच पी कंपणी गोडाउन मध्ये ठेवलेले बांधकामाचे लोहा व
सिमेन्ट मालापैकी किंमत २,६७, ८५३ रूपयेचा ७० बन्डल १० एम एम रिटल (७०० बार ) वजन ५. २०८ टन, किंमत १५,००० रूपये, अंबुजा कंपणीचे ५० सिमेन्ट बॅग असा एकुण २.८२.८५३ रूपये चा माल हेतुपुरस्पर चोरी केल्याने
तक्रारीवरून पो स्टे मुल येथे कलम ३०३ (२) बि एन एस अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर आहे.
सदर गुन्हयात मुल पोलीस यांचे कडुन त्वरीत दखल घेण्यात येवुन तांत्रीक / कौश्यल्यपुर्वक तपास करून ६ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात आले. आरोपीस अटक करण्यात येवुन पिसीआर प्राप्त करून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेले ट्रॅक्टर ट्राली असा एकुण ७,८२,८५३ रूपये चा मुददेमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनाखाली विजय राठोड यांचे नेतृत्वात सबोध वंजारी, भोजराज मुंडरे, इंदल राठोड, सुनिल कुळमेथे, गणेश मेश्राम, संदिप चुधरी, नरेश कोडापे, वेदनाथ करंबे, संदिप चुधरी, शंकर बोरसरे, दिलीप आदि यांनी केली आहे.