Home आपला जिल्हा Breaking News बेंबाळ महसूल मंडळ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्याचे...

बेंबाळ महसूल मंडळ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्याचे वाटप

317

उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन मूल :— महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल ​समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक 1 ची सुरूवात आज 7 मार्च 2026 रोजी मूल तालुक्यातील मौजा बेंबाळ येथे करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मृदुला मोरे यांनी केले. यावेळी विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणा—या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
सदर शिबिरादरम्यान सामाजिक अर्थसहाय योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेश,नविन रेशनकार्ड,जात प्रमाणपत्र,नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न दाखल,आधार प्रमाणीकरण,पिएमकिसन योजना,आयुष्यामन कार्ड,तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. ७/१२ उतारा दुरुस्ती व डिजिटल ७/१२ वितरण, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, जात, उत्पन्न, रहिवासी आदी दाखल्यांचे वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनांची माहिती, मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना, शासन जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण व पट्टे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दाखले वितरण, हेल्पडेस्कद्वारे अभिलेख दुरुस्ती मार्गदर्शन करण्यात तसेच वर्ग.1 करण्यात आलेल्या जमिनीचे 7/12 उतारे व दुरूस्ती केलेले 7/12 उतारे लाभाथ्र्याना प्रत्यक्ष देण्यात आले.विविध योजनांसाठी नव्याने अर्जही स्वीकारण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी चरडे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले व हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य करावे,असे सांगितले.
कार्यक्रमास गट विकास अधिकारी,उपअधीक्षकभूमिअभिलेख,नायब तहसिलदार पवार,विजय पंडीले,संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार चिडे,पुरवठा विभागातील शिरभाते कृषि अधिकारी,तालुका वैधकिय अधिकारी,तसेच अधिकारी वर्ग तसेच बेंबाळ येथील सरपंच चांगदेव केमेकर,नांदगाव येथील सरपंच हिमाणी वाकूडकरआदी उपस्थित होते. तसेच बेंबाळ महसूल मंडळातील सर्व तलाठी,मंडळ अधिकारी,मूल तहसील मधील सर्व कर्मचारी वृंद,तसेच महिला कर्मचारी,बेंबाळ महसूल मंडळातील सेतू केंन्द्रचालक तसेच आधार संचालक व मोठया संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.