Home आपला जिल्हा Breaking News दोन सख्ख्या भावांच्या डोक्यावर फोडली बिअरची बॉटल

दोन सख्ख्या भावांच्या डोक्यावर फोडली बिअरची बॉटल

53

डोक्यावर फोडली बिअरची बॉटल
मूल ;- खिशातून पैसे काढल्याच्या कारणावरून आरोपींनी दोन सख्ख्या भावांच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडून गंभीर जखमी केल्याची घटना भेजगाव येथील न्यू बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी (दि. १८) दुपारी ४ वाजता घडली. आकाश अनिल तेल्लावार (३०), अनिकेत अनिल तेल्लावार (२७, रा. भेजगाव) अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष हरिदास लेनगुरे (२५), मनोज नामदेव लेनगुरे (३२) यांना ताब्यात घेतले आहे. आकाश व अनिकेत तेल्लावार, आरोपी सुभाष लेनगुरे आणि मनोज नगुरे हे चौघे न्यू बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये दुपारी दारू पित होते. अनिकेत तेल्लावारने मनोजच्या खिशातून दहा हजारांची बंडल काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनोज व अनिकेतमध्ये जोरदार वाद झाला.

 

वादाचे पर्यवसान हाणामारीत होताच आरोपी मनोज व सुभाषने दोनही भावांच्या डोक्यावरच बिअरची बॉटल फोडली. यात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.ही माहिती पोलिस पाटलाने ठाण्यात सांगितल्यानंतर पथक दाखल झाले.जखमींना चंद्रपुरात हलविण्यात आले.