Home आपला जिल्हा Breaking News विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’@चिरोली येथे बाल आनंद मेळावा

विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’@चिरोली येथे बाल आनंद मेळावा

49

मूल: पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चिरोली जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, हे हेरून बुधवारी सकाळी ११:०० वाजता शाळेच्या पटांगणात बाल आनंद मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याचे उद्घाटन येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लीलाधर गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक धनू मडावी उपस्थित होते. अभ्यासक्रमाचा ताण कमी करणे, मनोरंजन करणे आणि व्यावहारिक शिक्षण देणे, या हेतूने आनंद मेळावा घेण्यात आला. यामुळे मुलांना
तोटा,
पैशांची देवाणघेवाण, नफा ग्राहकांशी संवाद साधणे यांसारखे प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी, भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, पॅटीस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पंकज निकुरे, अतुल यारावार, राखी येरमलवार, कविता निकुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक परमानंद कुमरे, नंदनवार, शिक्षिका उज्ज्वला कुलकर्णी, वर्षा कुळमेथे, अनिता कोडापे, शशिकला शेंडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला.