‘मातीचे शिलेदार’ तर्फे कुंभार समाजातील गुणवंतांचा सत्कार अॅड. संजय रुईकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
मूल : जगात ज्ञानाला किंमत आहे. त्यामुळे ज्ञानीयांचा सर्वत्र सन्मान होतो. ज्या समाजातील तरुण ज्ञानोपासना करून सर्जनशील बनतात तो समाज पुढे जातो. कारण जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मीला यावंच लागते. त्यामुळे ज्ञानी होणे हाच खरा पराक्रम आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. नरेंद आरेकर यांनी केले.
मातीचे शिलेदार तर्फे मूल येथे मा. सा. कन्नमवार सभागृहात आयोजित कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थी व प्रतिभावंतांच्या सत्कार सोहळ्यात ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे पैलू’ या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लायक व्हायच्या आधी लाइक्स मिळविण्याचा प्रयत्न करू नका. संघर्षाशिवाय कुणाला काही मिळत नाही. जी माणसे डोक्याने चालतात ते उंची गाठतात. त्यासाठी स्वतःतील स्वत्वाला उजागर करण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण महर्षी अॅड. संजय रुईकर यांनी केले. तर अध्यक्षस्थानी माजी तहसीलदार नामदेव चात्रेशवार हे होते. यावेळी राम बोरसरे, अनिल चेरकुरवार, ताराचंद कोटांगले, दिलीप ठाकरे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड संजय रुईकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमतांवर विश्वास ठेवून नव्या वाटा निवडण्याचा सल्ला दिला. तर नामदेवराव चात्रेशवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची गरज प्रतिपादित केली. यावेळी अॅड संजय रुईकर यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी समाजरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ८२ गुणवंत विद्यार्थी व समाजातील सेवाव्रती व्यक्तींचा सत्कारकरण्यातआला. यात त्रिशाला संगमवार, आर्थिक पाठक, अनुश गोटमवार, क्षितिज रामगुंडेवार यांना
प्रथम पुरस्कार तर गणेश खोबरे, हर्षिका गरपल्लीवार यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय समाजातील पदवीधर व इतर प्रज्ञावंतांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ओमप्रकाश पांडे, सचिन कालेशवार, संजय बोरसरे, नवीन शेगमवार, मोरेश्वर मार्कंडवार, बबन बोरसरे, मारोती गुडमेटलावार, गणेशजी खोबरे, रवींद्र रामगुंडेवार, उमा मडगुलवार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यातआले.
‘






