Home आपला जिल्हा Breaking News माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मूल – बारावी निकाल १०० टक्के...

माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मूल – बारावी निकाल १०० टक्के निकाल

745

मूल (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मूल या महाविद्यालयाने यंदा १०० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
🔹 प्रथम क्रमांक: कु. मयुरी चरनदास सतरे – 69.50%
🔹 द्वितीय क्रमांक: कु. आर्यन प्रफुल मेश्राम – 68.17%
🔹 तृतीय क्रमांक: कु. जानवी शालिक वासेकर – 67.83%
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊराव झाडे सर, मुख्याध्यापिका रीमा कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद सर, तसेच ज्युनियर कॉलेज प्रभारी, वर्गशिक्षक दुष्यंत गणवीर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढील शैक्षणिक सत्र 2026–27 पासून या कनिष्ठ महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स ही नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.
या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.