दि. ०१ मे २०२६, रोज शुक्रवारला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या स्मरणार्थ शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन झाले.
महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दुर्योधन कन्नमवार यांनी केले.
कार्यक्रमाचे वातावरण देशभक्ती व अभिमानाने भारलेले होते.








