वय वंदना कार्ड काढले का?, सत्तरीपार ज्येष्ठांना १० लाखांचे ‘आरोग्यकवच’ !
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा : महागड्या शस्त्रक्रिया, विविध गंभीर आजारांचाही योजनेत समावेश
वाढत्या वयोमानानुसार
आरोग्यविषयक समस्या उपचारांचा खर्च ही नागरिकांसाठी मोठी चिंता असते.
आणि
ज्येष्ठ
हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत ७० वर्षावरील सर्व ज्येष्ठांसाठी वय आता उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता सत्तरी पार केलेल्या प्रत्येक ज्येष्ठाला हक्काचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे वय वंदना कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ज्यांना मोबाइलवर प्रक्रिया करणे जमत नाही, अशा ज्येष्ठांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सीएससी) किंवा सेतू केंद्रात जाऊन आधारकार्डच्या मदतीने हे कार्ड काढून घ्यावे. तसेच सर्व ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांत असलेल्या आयुष्मान कक्षातही ही सुविधा मोफत उपलब्ध राहणार आहे.
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रशासनाने गावपातळीवर मोहीम राबवून कार्ड काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ज्येष्ठांना १० लाखांपर्यंत आहे उपचारांची तरतूद सामान्य आयुष्मान कार्डवर ५ लाखांची मर्यादा आहे. मात्र, ७० वर्षांवरील ज्येष्ठांना गंभीर आजारांसाठी जास्त खर्च लागतो. त्यामुळे ‘वय वंदना’ अंतर्गत ही मर्यादा वाढवून १० लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या शस्त्रक्रियांचा भार आता सरकारच्या तिजोरीवर असेल. औषधे, तपासणी आणि भरती होण्यापूर्वीचा खर्चही यात समाविष्ट आहे.
आयुष्मान आणि वय वंदना कार्डमध्ये काय फरक ?
सामान्य आयुष्मान कार्ड: हे
जनगणनेच्या पात्रतेनुसार मिळते. ज्यात कुटुंबाला वार्षिक ५ लाखांपर्यंत उपचार मिळतात.
वय वंदना कार्ड : हे केवळ ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. जर कुटुंबात दोन ज्येष्ठ असतील, तर दोघांनाही स्वतंत्र किंवा संयुक्त कार्ड मिळते. महत्त्वाचे म्हणजे, हे कार्ड कुटुंबाच्या ५ लाखांच्या मर्यादेव्यतिरिक्त अतिरिक्त संरक्षण देते.
इथेही काढता येईल कार्ड
ज्यांना मोबाइलवर प्रक्रिया करणे जमत नाही, अशा ज्येष्ठांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा सेतू केंद्रात जाऊन आधारकार्डच्या मदतीने हे कार्ड काढून घ्यावे. तसेच सर्व ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात असलेल्या आयुष्मान कक्षातही ही सुविधा मोफत उपलब्ध आहे.
सरकारीसह खासगी रुग्णालयातही लागू
या योजनेचा लाभ केवळ सरकारी रुग्णालयातच नाही, तर योजनेत समाविष्ट असलेल्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही घेता येतो. वर्धा जिल्ह्यासह राज्यातील अनेक नामांकित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
घरबसल्या असे बनवा
‘वय वंदना’ कार्ड
मोबाइलमध्ये ‘Ayushman
‘ App डाऊनलोड करा, ‘Beneficiary’ पर्याय निवडून मोबाइल नंबर टाका आणि ओटीपीने लॉगिन करा. ७० वर्षे वयाचा पर्याय निवडून आधार नंबर टाका, आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर ओटीपी येईल, तो सबमिट करा. स्वतःचा लाइव्ह फोटो काढून ई-केवायसी पूर्ण करा.
(३)
काही वेळातच तुमचे ‘वय वंदना’
कार्ड डाऊनलोडसाठी उपलब्ध होईल. रुग्णालयातील आरोग्य सेवकांकडूनही काढता येते.
Home आपला जिल्हा Breaking News वय वंदना कार्ड काढले का?, सत्तरीपार ज्येष्ठांना १० लाखांचे ‘आरोग्यकवच’








