Home आपला जिल्हा Breaking News शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी आजपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात

शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी आजपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात

120

महाटीईची परीक्षेचा बिगुल
वाजला, वेळापत्रकही केले जाहीर
शिक्षक पात्रता परीक्षा
(महाटीईटी) २०२६ साठीचे वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २५ मार्च रोजी जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी पेपर एक आणि पेपर दोन यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. टीईटी परीक्षा येत्या २१ जून रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार २७ मार्चपासून ऑनलाइन माध्यमातून सुरू होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उर्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर आता परिषदेने आगामी परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २१ जून रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना शुक्रवार २७ मार्चपासून ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ होणार आहे. याकरिता येत्या १६ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सदरचा अर्ज हा केवळ इंग्रजी भाषेतच भरावा लागणार असून, ऑफलाइन अर्ज मात्र स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे संबंधित परीक्षार्थीना अर्ज भरताना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. या परीक्षेकरिता प्रवेशपत्र ९ ते २१ जून या कालावधीत ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
आजपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला होणार
सुरुवात, २१ जूनला परीक्षा
सत्रांमध्ये होणार
परीक्षा
टीईटी परीक्षा ही येत्या २१ जून रोजी दोन
सत्रांत घेतली जाणार आहे.
यामध्ये पेपर क्रमांक एक
प्राथमिक स्तर सकाळी
१०:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर पेपर क्रमांक दोन हा दुपारी २:३० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. दरम्यान पेपर १ आणि,
पेपर २ दोन्ही पेपर देऊ इच्छिणाऱ्या
उमेदवारांनी एकाच अर्जात दोन्ही स्तरांचा पर्याय निवडावा, अशा सूचना परीक्षा परिषदेने केल्या आहेत.
अर्ज भरताना अशी
घ्या काळजी
टीईटी परीक्षेसाठी अर्ज करताना
परीक्षार्थीना दहावी, बारावी,
तसेच शैक्षणिक व
व्यावसायिक अर्हतेची
माहिती मूळ प्रमाणपत्रानुसार अचूक भरावी लागणार आहे. स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र आणि स्वयं घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. यानंतर अर्ज अंतिम समजला जाणार आहे.