मुल- आज दिनांक 16/03/2026 ला पाणी फाउंडेशन,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुल व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने बावणवाडी जिल्हा भंडारा येथे आयोजित तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाकरिता मुल तालुक्यातील 55 शेतकऱ्यांना रवाना करण्यात आले. यावेळी श्री सुनील कारडवार, तालुका कृषी अधिकारी मुल यांनी रा.मा. प. महामंडळाच्या बसला हिरवी झेंडे दाखवून बस प्रशिक्षणाकरिता रवाना केली.
सदर प्रशिक्षण हे निवासी प्रशिक्षण असून ते दिनांक 16 मार्च 18 मार्च या कालावधीत नेचर प्राईड रीसॉर्ट बावनवाडी जिल्हा भंडारा येथे आयोजित करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षणाकरिता मुल तालुक्यातील एकूण 100 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आलेली असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांसोबत पाणी फाउंडेशन नोडल अधिकारी श्री. इमरान खान पठाण व कृषी विभागाचे नोडल अधिकारी श्री. प्रफुल्ल गोरे सहाय्यक कृषी अधिकारी हे सुद्धा बस सोबत रवाना झाले. बस रवाना करतेवेळी श्री जितू झोडे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) मुल व उमेदचे व्यवस्थापक व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.








