Home आपला जिल्हा Breaking News मूल येथील भूपेश निमसरकर भरारी@पाण्याच्या टाकीत कचरा बघताच बदलली दृष्टी !

मूल येथील भूपेश निमसरकर भरारी@पाण्याच्या टाकीत कचरा बघताच बदलली दृष्टी !

529

पाण्याच्या टाकीत कचरा बघताच बदलली दृष्टी !
नोकरी नाही म्हणून अनेक युवक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. मात्र, इच्छाशक्ती असली की स्वयंरोजगाराचे मार्ग गवसतात.
त्यातून स्वाभिमानाने आयुष्य जगण्याची संधी मिळते. स्वतःसोबतच समाजाचेही हित साध्य होते. मूल येथील भूपेश सुनील निमसरकर हे याच जिद्दीचे एक नाव. स्वत:च्या घरावरील पाण्याच्या टाकीत कचरा व माती बघताच त्याची दृष्टी बदलली आणि गरिबांनाही परवडेल, अशा फिल्टरची त्याने निर्मिती केली.
भूपेश निमसरकर या युवकाने आय. टी. आय. पंप ऑपरेटर इन मेकॅनिकचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आपल्या शिक्षण व अनुभवाचा फायदा जनतेला कमी किमतीत शुद्ध पाणी देता यावे, हा विचार त्याच्या मनात आला. मात्र, मार्ग काही मिळत नव्हता. एके दिवशी भूपेश स्वतःच्या घरची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी खाली उतरला. तेव्हा टाकीतील धूळ, माती, चिला, क्षार व रेतीचे कण बघून तो चक्रावला.
टाकीच्या तळाशी असलेले धूळ, गाळ, माती हे या मिश्रित स्वरूपात येणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे पाइपलाइन, नळाच्या टोप्या, आरओ फिल्टर बरेचदा खराब होत असल्याचे दिसून आले. या समस्येवर उपाय म्हणून जास्त काळ टिकणारे आणि कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्स नसणारे सयंत्र शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयोग केल्यानंतर अखेर त्याला यश आले. यातील काही कमतरता दूर करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
असे आहेत फायदे
भूपेश तयार केलेल्या सयंत्रणेने पाणी शुद्ध होते. अशुद्ध पाण्यामुळे होणार विविध प्रकारचे आजार टळतात. लोकांना कमी खर्चात घरीच शुद्ध पाणी करता येते. या फिल्टर यंत्रणाने सर्वसामान्य व गरीब कुटुंबांनाही दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र स्टार्टमध्ये भूपेशची भरारी
महाराष्ट्र स्टार्ट यात्रेच्या निमित्ताने चंद्रपुरातील शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालयात सयंत्राची प्रदर्शनी लावली होती. त्यात दुसरा क्रमांक मिळाला. यामध्ये या सयंत्राचे दोन प्रकार आहेत. एक पिण्याचे व स्वयंपाक करण्यासाठी तर दुसरे बोरवेलच्या पाण्यातील क्षार कमी करून आंघोळ व इतर कामासाठी वापरता येणार आहे. भूपेश लोकोपयोगी सयंत्रणाची निर्मिती केल्याने घरोघरी लावले जात आहे.

ग्रामपंचायतींना फिल्टर ठरला उपयुक्ततंत्रज्ञानावर आधारित असलेले हे नळ फिल्टर विहीर, बोरवेल,नगरपंचायतीच्या दूषित पाण्यातील रेती,गाळ व अशुद्धता सहजपणे गाळून टाकते. पिण्याचे शुद्ध पाणी वस्वयंपाकाचे पाणी वापरण्यास मदत करते. सेडीमेंट पोलोप्रोफिलिन मटेरियल टेक्नॉलॉजीने पाण्यातील रेती, गाळ, धूळ, गंजाचे कण आणि इतर अशुद्धता प्रभावीपणे अडवते. हा फिल्टर विहीर, बोअरवेल व नगरपंचायत, ग्रामपंचायतीत पाण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. ग्रामीण भागातीलपाणीपुरवठा व्यवस्थेसाठी लाभदायक असल्याचा दावा भूपेशने केला आहे.

अशुद्ध पाण्यापासून अनेक आजार होतात. त्यामुळे कमी खर्चात शुद्धता सयंत्रणा तयार करण्याचे माझे स्वप्न होते. तंत्रशिक्षण, अनुभव व वारंवार केलेल्या प्रयोगामुळे मला हे यश मिळाले. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत पुरस्काराचा मानकरी ठरलो. भूपेश निमसरकर, मूल