Home आपला जिल्हा Breaking News राजोली येथे शासन आपल्या दारी@ महसूल समाधान शिबिराचे आयोजन

राजोली येथे शासन आपल्या दारी@ महसूल समाधान शिबिराचे आयोजन

219

शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्या शासनाच्या विविध योजना
राजोली येथे शासन आपल्या दारी; महसूल समाधान शिबिराचे आयोजन
चिखली महसूल मंडळ भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाने राजोली परिसरात नवा उत्साह निर्माण केला आहे.


उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदृुला मोरे, राजोली येथील सरंपच,चिखली येथील सरपंच,उपसरपंच,भाुदर्णा येथील सरंपच ,श्री दिपक देशपांडे व इतर पदाधिकारी जागृत ग्राहक राजा सामाजिक व ग्राहक संघटना नागपूर
प्रांत अध्यक्ष ता.मुल जि.चंद्रपूर   नायब तहसीलदार पंडीले,नायब तहसीलदार पवार, तालुका कृषी अधिकारी ,पुरवठा विभागातील शिरभाते, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, ग्रामसेवक, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार मृदुला मोरे यांनी या शिबिराचे नेटके नियोजन केले होते. या शिबिरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्टॉल लावून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. अशा शिबिरांमुळे मूल तालुक्यातील चिखली महसूल मंडळ अंतर्गत नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

मूल तालुक्यातील मुरमाडी,गांगलवाडी,राजोली,चिखली,भादुर्णाा शेवटच्या टोकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे म्हणजेच ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना साकार होणे होय. ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम करत आहे. शिबिराच्या
माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तसेच विविध योजनांची माहिती दिली. अजय चरडे, उपविभागीय अधिकारी मूज तसेच तहसीलदार मृदुला मोरे नागरिकांच्या समस्यांचे केले निराकरण
सदर शिबिरादरम्यान सामाजिक अर्थसहाय योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेश,नविन रेशनकार्ड,जात प्रमाणपत्र,नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न दाखल,आधार प्रमाणीकरण,पिएमकिसन योजना,आयुष्यामन कार्ड,तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. ७/१२ उतारा दुरुस्ती व डिजिटल ७/१२ वितरण, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, जात, उत्पन्न, रहिवासी आदी दाखल्यांचे वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनांची माहिती, मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना, शासन जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण व पट्टे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दाखले वितरण, हेल्पडेस्कद्वारे अभिलेख दुरुस्ती मार्गदर्शन करण्यात तसेच वर्ग.1 करण्यात आलेल्या जमिनीचे 7/12 उतारे व दुरूस्ती केलेले 7/12 उतारे लाभाथ्र्याना प्रत्यक्ष देण्यात आले.विविध योजनांसाठी नव्याने अर्जही स्वीकारण्यात आले.नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले व नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर चिखली मंडळातील नागरिक व शेतकरी महिला उपस्थित होत्या.