Home आपला जिल्हा Breaking News वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार@फिस्कुटी शेतशिवारातील घटना

वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार@फिस्कुटी शेतशिवारातील घटना

494

वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठारमूल तालुक्यातील फिस्कुटी शेतशिवारातील घटना; परिसरात भीतीचे वातावरणमूल / प्रतिनिधी – मूल तालुक्यातील फिस्कुटी शेतशिवारात शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला करून एका मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव गणपतजी कंकलवार (रा. जुनासुर्ला) हे शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन फिस्कुटी येथील शेतशिवारात महाकाली मंदिर परिसरात मुक्कामी होते. रात्रीच्या वेळी ते आपल्या भावासोबत कळपाजवळ झोपलेले असताना सुमारे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वाघाने अचानक हल्ला केला.

हल्ल्यानंतर वासुदेव कंकलवार यांचा शोध घेतला असता नातेवाईकांना जवळच त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभाग व वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी मूल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.