Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

मूल शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

256

शहरातील वार्ड नंबर 14 भिमवाडी परिसरासह अनेक भागात मोकाट कुत्त्यांचा हैदोस वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ही टोळके दुचाकी जवळुन जात असताना चालकाच्या अंगावर धावुन जातात.
शहरालगतच्या मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटे फिरायला निघालेल्या एका महिलेला या कुत्र्यांनी चावा घेतल्याने महिला जखमी झाली. या कुत्र्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे गावात भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपुर्वी आदिवासी हॉस्टेल,कुत्राने माराला वासराला मारला मोकाट कुत्र्यांनी तिचा चावा घेतल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी
नगरपरीषद मूल वारंवार सांगण्यात आले . परंतु, न.प.मूल यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मूल शहरातील स्थानिकांचा आहे.

मूल शहरात सध्या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक आणि पशुपालक त्रस्त झाले आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आज सकाळी एका निष्पाप वासराला या कुत्र्यांनी फाडून खाल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज सकाळी ८:२० वाजताच्या सुमारास मूल येथील मोकळ्या मैदानात मोकाट कुत्र्यांच्या टोळीने एका वासराला घेरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून कुत्र्यांनी त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांसोबतच डुकरांचाही मोठा वावर वाढला असून, हे प्राणी आता पाळीव जनावरांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये कुत्र्यांच्या झुंडी फिरत असतात, ज्यामुळे लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.
“शहरातील मोकाट कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.