Home आपला जिल्हा Breaking News मूल तालुक्यांतील चिखली महसूल मंडळ गावातील राजोली येथे समाधान शिबिर उद्या शनिवारी...

मूल तालुक्यांतील चिखली महसूल मंडळ गावातील राजोली येथे समाधान शिबिर उद्या शनिवारी (दि. १४)

145

प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी शासनातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा-१ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी (दि. १४) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मूल तालुक्यांतील चिखली मंडळस्तरावरील राजोली येथे या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल विभागाशी संबंधित सेवा व विविध शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळातील
नागरिकांपर्यंत पोहोचतणे त प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करणे हा आहे. या अभियानांतर्गत शनिवारी (दि. १४) तालुक्यातील चिखली मंडळातील राजोली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
शिबिरातून या सेवा मिळणार
शिबिरातून नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी एक खिडकी व्यवस्थेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७- १२ व ८ अ उताऱ्यांची दुरुस्ती व वितरण, उत्पन्न, रहिवासी व जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, अकृषक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सदन प्रक्रियेची माहिती, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई- मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषक परवानगीप्रकरणी कमी-जास्त पत्रकेतयार करून गाव दफ्तर अद्ययावत
करणे आदी सेवा समाविष्ट असणार आहेत.