Home आपला जिल्हा Breaking News ऑनलाइन प्रक्रिया सुरू : २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश@कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य

ऑनलाइन प्रक्रिया सुरू : २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश@कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य

42

आरटीई प्रवेश बिगुल वाजला, १० मार्चपर्यंत अर्ज
आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू : २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश
 शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार १७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार पालकांना मुलांचे ऑनलाइन अर्ज १० मार्चपर्यंत भरता येणार आहेत.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हक्क कायद्यानुसार (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी ९ जानेवारी रोजी शाळा नोंदणींची प्रक्रिया सुरू झाली आणि मुदतवाढीसह संबंधित प्रक्रिया ३० जानेवारीला बंद करण्यात आली. आता
महत्त्वाच्या गाईडलाईन
आरटीई पोर्टलवर निवासस्थानाच्या ठिकाणापासून १ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा दिसतील, एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीत विचारात घेतला जाणार नाही. पालकांना दहा शाळांची निवड करावी लागणार आहे. पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे, चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्यास आरटीई प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होणार, अर्ज भरताना पालकांनी निवासस्थानाचे ठिकाण अचूक नमूद करावे.

जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रवेशाकरिता मंगळवार १७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे.
ही कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य
आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य, बालकांचे जन्मप्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा अनिवार्य, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक (सर्व घटकांना अनिवार्य), सामाजिक वंचित घटक, पालकांचा,
बालकांचा जातीचा दाखला व
अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य,
परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य
धरण्यात येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांना उत्पन्नाचा दाखलो
कागदपत्रे करा अपलोड
आरटीई प्रवेशासाठी अनेक पालकांकडून कागदांमध्ये अफरातफरी करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे यंदा शिक्षण विभागाने अर्ज भरतानाच कागदपत्रे अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.