Home आपला जिल्हा Breaking News दरमहा मिळणार तीन हजार रुपये पेन्शन!असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

दरमहा मिळणार तीन हजार रुपये पेन्शन!असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

51

आता म्हातारपणाची चिंता सोडा; दरमहा मिळणार तीन हजार रुपये पेन्शन!
असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना फायदेशीर
चंद्रपूर : जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ (पीएमएसवायएमवाय ) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असून, जास्तीत जास्त कामगारांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्रवीण कावळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कष्टकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. १८ ते ४० वयोगटातील पात्र कामगारांनी आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रात (सीएससी) जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
येथे साधा संपर्क
अधिक माहितीसाठी कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, चंद्रपूर येथे किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर संपर्क साधावा, असे प्रशासनाकडन सांगण्यात आले आहे..
योजनेचे फायदे आणि
पेन्शनचे स्वरूप
या योजनेत लाभार्थ्याला त्याच्या वयानुसार ५५ ते २०० रुपयांपर्यंत मासिक अंशदान भरावे लागेल. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर संबंधित कामगाराला दरमहा तीन हजार रुपये निश्चित पेन्शन मिळेल. लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शनच्या ५० टक्के रक्कम म्हणजेच दीड हजार रुपये कौटुंबिक पेन्शन दिली जाईल. विशेष म्हणजे, एखाद्या लाभार्थ्याला योजनेतून बाहेर पडायचे असल्यास, त्याने जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्याची तरतूदही यात आहे. काय आहेत पात्रता व अटी ?
१८ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुष व स्त्री कामगार या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असावे, कामगार हा आयकर भरणारा नसावा, ईपीएफओ, ईएसआयसी किंवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा (एनपीएस) सदस्य नसावा.