Home आपला जिल्हा Breaking News मामला व महादवाडी जंगलातील थरारक घटना; एकाच दिवशी पाऊण तासातच वाघाचे दोन...

मामला व महादवाडी जंगलातील थरारक घटना; एकाच दिवशी पाऊण तासातच वाघाचे दोन हल्ले, दोन मजूर ठार

79

पाऊण तासातच वाघाचे दोन हल्ले, दोन मजूर ठार
मूल (चंद्रपूर) बांबू कटाईचे काम करताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाऊण तासाच्या फरकाने झालेल्या वाघांच्या हल्ल्यात दोन मजूर ठार झाले. शनिवारी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील मामला व महादवाडी परिसरात या घटना घडल्या. प्रेमसिंग दुखी उदे (वय ५५, रा. बालाघाट), बुदसिंग श्यामलाल मडावी (वय ४१, रा. मुंडला, बालाघाट) अशी मृतांची नावे आहेत.
बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू आहे. वनविभागाने बालाघाट येथून कामासाठी मजूर बोलावले आहेत. काही मजूर महादवाडी बिटात तर काही मामला बिटात बांबू कटाईचे काम करत आहेत. मामला बिटातील कक्ष क्रमांक ३८१ मध्ये दुपारी ३.४५ च्या सुमारास बांबू कटाईचे काम करण्यात मग्न असलेल्या बुदशिंग श्यामलाल मडावी यांच्यावर अचानकपणे वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. पाऊण तासाच्या फरकाने काहीच अंतरावर महादवाडी बफर झोन कक्ष क्रमांक ३५७ मध्ये प्रेमसिंग दुखी उदे यांच्यावर दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले.