Home आपला जिल्हा Breaking News अवैध गोवंश वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गोवंश वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस लाखांचा मुद्देमाल जप्त

71

कत्तलीसाठी सुरू असलेली गौवंश तस्करी उघडकीस
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : पोलीस प्रशासनाने गोवंश संरक्षणाबाबत कठोर भूमिका घेत पोलीस स्टेशन मुल हद्दीतील नांदगाव परिसरात नाकाबंदी अवैध गोवंश वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केलेल्या या कारवाईत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ८ बैल व पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६ लाख ६० हजार रुपये आहे. २६ डिसेंबर २०२५ रोजी गोपनीयमिळालेल्यामाहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव परिसरात नाकाबंदी लावली. यादरम्यान एमएच ३४ बीझेड ९१५२ क्रमांकाच्या पिकअप वाहनास अडवून तपासणी केली असता वाहनात अमानुष पद्धतीने भरलेले ८ गोवंशीय बैल आढळून आले.हे जनावरे कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक केली जातअसल्याचे स्पष्ट झाले.याप्रकरणी स्वप्नील प्रल्हादकुलमेथे (३२), रा. येरगाव, ता. पोंभुर्णा व विजय खुशाल बट्टे (२७), रा. घडोली, ता. गोंडपिपरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच फैयाज रा. करीमनगर, तेलंगणा हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन मुल येथे गुन्हा क्रमांक६१९/२०२५ दाखल करण्यात आला असून प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीसअधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा सुरेंद्र महतो व चापोअं गजानन मडावी यांनी केले.