Home आपला जिल्हा Breaking News फराळ वितरण करून मूल पोलिस पाटलांनी साजरी केली दिवाळी

फराळ वितरण करून मूल पोलिस पाटलांनी साजरी केली दिवाळी

68

मूल सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवत मूल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलिस पाटील संघटनेच्या वतीने शहरातील बसस्थानकाच्या मागील कोरकू गोंड या आदिवासी झोपडपट्टी वस्तीत दिवाळीच्या निमित्ताने फराळ वाटपाचा उपक्रम राबविला.
सोमवारी (दि. २०) पार पडलेल्या या उपक्रमात आदिवासी वस्तीतल्या महिलांना, लहान मुलांना आणि वृद्धांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले.
या प्रसंगी मूल पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष अमोल वाकुडकर, सचिव संतोष शुद्धलवार, गोपाल ठिकरे, पुंडलिक जवादे, राजू कोसरे, विजय कुमार दुर्गे, संदीप पोरटे, ओमदास पाल, छत्रपती कोहपरे, मनोहर भुरसे, रतन सोनुले, दिलीप शेंडे, संगीता चल्लावार, नंदाताई शेंडे, आशाताई देशमुख, प्रतिभा लहामगे, रत्ना पेळुकर, मालाताई वाळके यांच्यासह अनेक पोलिस पाटील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. विशेषतः प्रत्येकांनी शिक्षक घेऊन उच्चपदावर जाण्याचे आवाहन केले.