मूल : वाघाने हल्ला केल्याने गुराखी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. २२) दुपारी ३ वाजता सावली वनपरिक्षेत्रांतर्गत टेकाडी बीटातील कक्ष क्र. १७८२ मध्ये घडली. भगवान शीतकुरा गोहने (५७, रा. टेकाडी) असे जखमीचे नाव आहे. भगवान गोहने हे गायगोधनचा कार्यक्रम करून नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी जंगलात नेले असता वाघाने हल्ला केले. यात गुराखी गंभीर जखमी झाला. त्याला मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Post Views: 101