Home आपला जिल्हा Breaking News भाऊबीजेला सुट्टी देण्याचा निर्णय; पहा 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची संपूर्ण यादी

भाऊबीजेला सुट्टी देण्याचा निर्णय; पहा 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची संपूर्ण यादी

71

डिसेंबर महिना सुरु झाल्यानंतर सर्वांना नव्या वर्षाचे वेध लागतात. त्याप्रमाणं नव्या वर्षात शासकीय सुट्ट्या किती असणार याबाबत देखील उत्सुकता असते. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील वर्षातील म्हणजेच 2025 मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे 2025 मध्ये भाऊबीजेची सुट्टी देखील देण्यात आली आहे. त्यामुळं 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे.
23. भाऊबीज – 23 ऑक्टोबर 2025
24. गुरुनानक जयंती – 5 नोव्हेंबर 2025 25. ख्रिसमस-25 डिसेंबर 2025
भाऊबीजेची सुट्टी देण्याचा निर्णय
राज्य सरकारनं पहिल्यांदा जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश नव्हता. मात्र, त्यानंतर पुन्हा पत्रक काढून त्याचा समावेश केल्याचं सांगण्यात आलं. शासकीय कर्मचाऱ्यांना 2025 मिळणार भाऊबीजेची सुट्टी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचंड यशानंतर राज्य सरकारने भाऊबीजेची सुट्टी जाहीर केली आहे. सरकार कडून लाडकी बहीण आणि लाडक्या भावाला सुट्टीचे गिफ्ट देण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये विशेष उल्लेख करत अतिरिक्त सुट्टी जाहीर देण्यात आली आहे. दरवर्षी मिळणाऱ्या एकूण 24 सुट्ट्यांमध्ये अधिक एका सार्वजनिक सुट्टीची भर पडली आहे.