Home आपला जिल्हा Breaking News मूल येथे गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा

मूल येथे गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा

85

मूल तालुका क्रीडा संकुल, मूल येथे वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रात गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्टफिजिक्स क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुलचे प्रशिक्षक तसेच ग्रुप ऑफ फिट लिफ्टरचे संचालक एन. आय. एस. कोच करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ३० ते ४० महाविद्यालयातील अनेक खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेला उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे
तर अध्यक्ष म्हणून कृषी उत्त्पन बाजार समितीचे अध्यक्ष अखिल गंगारेड्डीवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून धर्मेंद्र सूत्रपवार, राकेश सातपैसे आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेताप्राप्त खेळाडूंना पदक व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सर्व विजयी खेळाडू हे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वेटलिफ्टिंग प्रशिक्षक करण कोसरे, तांत्रिक अधिकारी अमोल आवटे, आकाश चौधरी, पंकज बेले, दीपक भांडारकर, विष्णू वर्धन, येरमी, भूषण देशमुख, शाविल दयारकर, डॉ. अनिता लोहकरे यांनी सहकार्य केले.